Pimpri : पवना बँकेचा १० टक्के लाभांश

पिंपरी : पवना सहकारी बँकेकडून सभासदांसाठी यंदा सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करून आनंदाची बातमी दिली आहे. बँकेची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रागा पॅलेस, काळेवाडी येथे उत्साहात पार पडली.
सभेत अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी २०२४-२५ वार्षिक अहवाल सादर करताना बँकेची भक्कम आर्थिक स्थिती स्पष्ट केली. त्यांनी ठेवींची वाढ, कर्ज धोरणे आणि बँकेच्या यशस्वी प्रगतीबद्दल माहिती देत याचे सर्व श्रेय सभासद, खातेदार आणि कर्मचाऱ्यांना दिले. यंदा बँकेला ४ कोटी ५१ लाखांचा निव्वळ नफा झाला असून व्यवसाय १,१८९ कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे.
कार्यक्रमात उपाध्यक्ष वसंत लोंढे, ज्येष्ठ संचालक विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, शिवाजी वाघेरे, जयनाथ काटे, जितेंद्र लांडगे, सुनिल गव्हाणे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, सचिन काळभोर, चेतन गावडे, बिपीन नाणेकर, संभाजी दौंडकर, जयश्री गावडे, अॅड. उर्मिला काळभोर, अॅड. गोरक्षनाथ काळे, अॅड. नितीन लांडगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सीईओ मनेश बोऱ्हाडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले तर जयनाथ काटे यांनी प्रस्ताविक केले आणि उपाध्यक्ष वसंत लोंढे यांनी आभार मानले.





