Nagar | संत तुकाराम महाराज मंदिरासाठी १० लाखांचा निधी

टाकळीभान, (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर निर्माण कार्यासाठी विधान परिषद सदस्य आ. सत्यजीत तांबे यांनी १० लाख रुपयांचा निधी दिला.
गेले काही दिवसांपासून टाकळीभान येथे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर निर्माणाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लोकसहभाग तसेच अनेक दात्यांच्या वस्तूरूपी व आर्थिक मदतीतून हे मंदिर साकारले जात आहे.
आ.सत्यजीत तांबे यांनी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १० लाखांचा निधी दिला. सदर निधी सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीरामपूर यांना प्राप्त झाला आहे. लवकरच आराखडा तयार करून कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार असल्याचे सेवेकरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
सत्यजीत तांबे यांनी यापूर्वीही टाकळीभान येथील वाचनालयासाठी तसेच इतर विकास कामां साठी भरीव निधी उपल्ब्ध करून दिला.या निधीबद्दल ग्रामस्थ व सेवेकरी मंडळाच्या वतीने उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आ.सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहे.





