मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबारात 10 ठार, तर 7 जण जखमी

Mexico Firing | मेक्सिकोमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर ट्रकमधून आले आणि त्यांनी बारमध्ये घुसून गोळीबार सुरू केला. गोळीबार केल्यानंतर ते तेथून पळून गेले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. बारमध्ये अनेक लोक उपस्थित असताना ही घटना घडली.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात 10 जण जखमी झाले असून 7 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
मागील महिन्यातच ड्रग्ज-तस्करी-संबंधित हिंसाचाराने ग्रस्त मेक्सिकोच्या भागात दोन सशस्त्र हल्ल्यांमध्ये डझनभर पोलिस अधिकाऱ्यांसह किमान 16 लोक ठार झाले. गुरेरोच्या दक्षिणेकडील राज्यात, अज्ञात हल्लेखोरांनी कोयुका डी बेनिटेझ नगरपालिकेतील सुरक्षा गस्तीला लक्ष्य केले, असे फिर्यादी अलेजांद्रो हर्नांडेझ यांनी सांगितले.
या घटनेनंतर या परिसरात सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु गेल्या काही दिवसांपासून या भागात वाढलेल्या हिंसाचाराचाही या घटनेशी संबंध जोडला जात आहे. त्यानुसार आता तपास केला जात आहे.
हेही वाचा:
महिलांना तीन हजार रुपये, तर बेरोजगारांना दरमहा 4 हजार; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?





