महिन्याभरापासून वेस्ट बँकमध्ये 10 भारतीय कामगारांना ठेवले होते ओलीस, इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी केली सुटका

Indian workers held in West Bank | मागील एक महिन्यांपासून वेस्ट बँक येथे ओलीस ठेवण्यात आलेल्या 10 भारतीय बांधकाम मजुरांची सुटका करण्यात आली आहे. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी वेस्ट बँकमध्ये अडकलेल्या या मजूरांची यशस्वीपणे सुटका केली आहे. हे मजूर कामाच्या शोधात इस्त्रायलमध्ये गेले होते. मात्र, तेथे त्यांनी ओलीस ठेवण्यात आले.
नोकरीचे आमिष दाखवून या 10 भारतीय कामगारांना वेस्ट बँकमधील एका गावात नेण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा पासपोर्ट काढून घेण्यात आला व बंधक बनवण्यात आले.
रिपोर्टनुसार, मजूरांची सुटकेसाठी ही बचाव मोहीम इस्त्रायलच्या लोकसंख्या आणि स्थलांतर प्राधिकरण इस्त्रायली संरक्षण दल (IDF) आणि न्याय मंत्रालयाद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे गुरुवारी रात्री कामगारांची यशस्वीपणे सुटका करण्यात आली. इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाने देखील याबाबतची माहिती दिली आहे.
Israeli authorities traced 10 missing Indian construction workers to West Bank & have brought them back to Israel.While the matter is still under investigation, the Embassy is in touch with the Israeli authorities & have requested to ensure their safety & well-being @MEAIndia
— India in Israel (@indemtel) March 6, 2025
भारतीय दूतावासाने ट्विट करत याबाबत माहिती दिली की, मजूर आता सुरक्षित आहेत आणि त्यांना इस्त्रायलमध्ये परत आणण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे व आम्ही इस्त्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. या मजुरांच्या सुरक्षिततेसंदर्भात त्यांनी विनंती केली आहे.
या मजुरांना वेस्ट बँकमधील अल-जायेम गावात ओलीस ठेवण्यात आले होते. तिथे काही लोकांनी त्यांच्या पासपोर्टचा वापर इस्त्रायलमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, गेल्या एका वर्षात जवळपास 16,000 भारतीय कामगार इस्त्रायलमध्ये बांधाम क्षेत्रात काम करण्यासाठी गेले आहेत.





