कर्जरोख्यांमुळे पालिकेला 10 कोटींचा भुर्दंड

पुणे – समान पाणीपुरवठा योजनेच्या खर्चासाठी महापालिका प्रशासनास बॅंक मुदत ठेवीतून सुमारे 20 कोटी 73 लाखांचे व्याज मिळाले आहे, तर कर्जरोख्यांच्या व्याजापोटी पालिकेने तब्बल 30 कोटी 36 लाख रुपये मोजले आहेत.

माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी मुख्यसभेत हा प्रश्‍न विचारला होता. त्यावर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुमारे 2 हजार 543 कोटी रुपयांचे आहे. यासाठी जून 2017 मध्ये सुमारे 200 कोटींचे कर्जरोखे काढले. मात्र, कामासाठी फेरनिविदा काढल्याने तसेच तूर्तास पैशांची गरज नसल्याने प्रशासनाने सुमारे 195 कोटी रुपये बॅंकेत मुदत ठेवीत ठेवले. त्यानंतर मागील दोन वर्षांत सुमारे 75 कोटी रुपये खर्च केले असून अजूनही 124 कोटी बॅंकेत आहेत. या ठेवीतील रकमेतून पालिकेस आतापर्यंत 20 कोटी 73 लाखांचे व्याज मिळाले आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेने हे कर्जरोखे 7.59 टक्के व्याजाने घेतल्याने पालिकेस दर सहा महिन्यांनी त्याचे व्याज मोजावे लागते. यापोटी पालिकेने गेल्या दोन वर्षांत तब्बल 30 कोटी 36 लाख रुपये रोखेधारकांना मोजले आहेत. त्यामुळे महापालिकेस आपल्याच पैशांसाठी तब्बल 10 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.

प्रोत्साहनपर अनुदान जातंय व्याजात
या कर्जरोख्यांवर मिळालेल्या 26 कोटींच्या प्रोत्साहनपर अनुदानातून केल्याचे सांगण्यात येत आहे. विकासासाठी कर्जरोखे काढल्याने नवे पर्व सुरू झाल्याचे सांगत केंद्राने हे अनुदान दिले होते.पण, ते कर्जरोख्यांचे व्याज भरण्यासाठी पालिका हा खर्च करत असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.