दिवसभरात देशभरात 1 लाख 7 हजार नव्या करोना रुग्णांची नोंद
Updated On:

नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत करोना प्रतिबंधक लसीच्या 45 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. तर भारतातील करोनामुक्तीचा दर 95.91 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासात 1 लाख 07 हजार 474 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन करोनाबाधितांची संख्या सध्या 12 लाख 25 हजार 011 आहे. देशात आढळलेल्या एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.90 टक्के आहे.
दिवसभरात एकूण 14,48,513 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 74.01 कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 10.20 टक्के आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 7.42 टक्के नोंदविण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 13 हजार 246 करोना रुग्ण बरे झाले.
टॅग्स:





