पुसेसावळी, (प्रतिनिधी) – कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी मंडलात सातारा जिल्हा वार्षिक योजना सन 2024/25अंतर्गत 5 पाणी साठवण बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी एकूण 4 कामांसाठी 1 कोटी 6 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती पुसेसावळी वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी दिली आहे कदम म्हणाले,या पाणी साठवण बंधाऱ्यामुळे तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांसह इतर गावांना मोठा दिलासा मिळाला असुन मोठा पाणी प्रश्न सुटणार आहे. पुसेसावळी परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दरवर्षी जाणवते. परिणामी, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्यासाठी वणवण करावी लागते अशी परिस्थिती या गावांमध्ये पाहायला मिळते. ग्रामस्थांनी देखील गावतलाव,ओढे नाले, बंधारे यांचा गाळ काढण्याची आवश्यकता आहे.गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. गावांमधील सिमेंट नाला बांधार्यांची कामे पूर्ण झाल्यास शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊन बोअरवेल व विहीरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. पुसेसावळी मंडलातील 4 पाणी साठवण बंधाऱ्यांच्या कामांमुळे परिसरात पाणीसाठा उपलब्ध होऊन पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.पुसेसावळी मांडवे शिवार,वडगाव (जयराम स्वामी) वेताळमळा चिरेबंदीवस्ती (गाव ओढ्यावर) साठवण बंधारा, म्हासुर्णे विभूतेवस्ती, चोराडे ओढ्यावर साठवण बंधारा असा समावेश आहे. धैर्यशील कदम यांचा पाठपुरावा कराड उत्तरचे विकासाभिप्रमुख नेतृत्व, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कामासाठी मी सातत्याने मागील अनेक दिवस पाठपुरावा करत होतो. उरमोडीच्या पाण्यामुळे खटाव तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढत आहे. अशावेळी एकूणच पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी पुसेसावळी विभागातील जलसंधारण कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचा धैर्यशील कदम यांचा दूरदृष्टिकोन महत्वाचा ठरला असेही शेवटी विक्रममशील कदम यांनी सांगितले.