Satara Election : पहिले मतदान, मगच लग्न! जावळी तालुक्यातील ‘या’ घटनेची सर्वत्र चर्चा..वाचा
Satara Election : वैयक्तिक आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व; जावळी तालुक्यातील धनगरपेढा येथे नववधूने मतदानाचा हक्क बजावून दिला प्रेरणादायी संदेश.
Updated On:

Satara Election – मतदान केंद्र क्रमांक 37/32, धनगरपेढा, ता. जावळी येथे लोकशाहीच्या उत्सवात एक प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या लग्न मंडपाकडे जाण्याआधी नववधू मनिषा डोईफोडे यांनी थेट मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिले मतदान, मग लग्न या ठाम भूमिकेतून त्यांनी लोकशाहीप्रती असलेली निष्ठा अधोरेखित केली.
लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या वेळापत्रकातही मनिषा यांनी मतदानासाठी वेळ काढला. मतदान केंद्रात पोहोचल्यावर उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच मतदारांनीही त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले. वैयक्तिक आनंदाच्या क्षणांपेक्षा लोकशाही कर्तव्याला दिलेले हे प्राधान्य अनेकांसाठी प्रेरणा ठरले.
मतदान हा केवळ अधिकार नाही, तर जबाबदारीही आहे, हा संदेश मनिषा डोईफोडे यांच्या कृतीतून ठळकपणे पुढे आला.जावळी तालुक्यातील या प्रेरणादायी प्रसंगामुळे लोकशाहीचा उत्सव अधिकच उजळला. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन करत मनिषा यांच्या या निर्णयाने ‘लोकशाही प्रथम’ ही भावना अधिक बळकट केली.




