Priyanka Chaturvedi : ‘राजकारणात भाषा आणि संयम राखायला हवा’; प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया
राजकारणात आई-बाप, बहीण-लडकी आणि मुलांना ओढणे पूर्णपणे चुकीचे आहे. या सर्वांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो असे त्या म्हणाल्या.

Priyanka Chaturvedi – मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या अपशब्दाच्या वापरानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचीही यावर महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्या भाषेवर संयम ठेवण्याचा आणि देशातील मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी राजकीय वक्तव्यांवर आणि घसरणाऱ्या पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.आजकाल राजकारणात भाषेचा दर्जा सातत्याने घसरत चालला आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
देशासमोरील मुख्य आणि ज्वलंत मुद्दे कोणते आहेत? महागाई, भ्रष्टाचार, मतचोरी आणि तरुणांच्या समस्या हे आजचे खरे मुद्दे आहेत.
मात्र, अशा वक्तव्यांमुळे मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित केले जात आहे. मी सत्ताधारी आणि विरोधी – दोन्ही पक्षांना आवाहन करते की त्यांनी बोलताना आपल्या भाषेचे भान ठेवावे आणि संयमाने आपली भूमिका मांडावी.
राजकारणात आई-बाप, बहीण-लडकी आणि मुलांना ओढणे पूर्णपणे चुकीचे आहे. या सर्वांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो असे त्या म्हणाल्या.






