Abhijeet Dipke : मोठी बातमी..! अभिजीत दीपके यांना अटक होणार; ट्विटने खळबळ !
या आंदोलनापूर्वीच CJPच्या प्रमुख नेत्यांनी अटकेची शक्यता व्यक्त केल्याने वातावरण तापलं आहे. अभिजीत दीपके यांनीही अटकेच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.

Abhijeet Dipke : दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेत्यांकडून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. CJPचे सहसंयोजक आणि प्रवक्ते सौरव दास यांनी सरकार अभिजीत दीपके, आशुतोष रांका, स्वतः दास आणि पक्षातील इतर नेत्यांना अटक करण्याची योजना आखत असल्याचा दावा केला आहे.
त्यानंतर आशुतोष रांका यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत १० ऑक्टोबरपूर्वी कोणत्याही क्षणी आपल्याला अटक होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणताही अधिकृत आदेश किंवा पुरावा समोर आलेला नाही.
Multiple sources have reached out informing that @abhijeet_dipke @SauravDassss and I will be arrested anytime before 10th under NSA/other equivalent provisions.
All three of us have been ready to go to Jail since June 6. There is no fear about it.
But the ones hell bent on destroying this country should be the ones frightened. And they are. As Gandhi said, “violence and hatred stem from fear”. The govt is frightened, and that’s why it is resorting to violence.
We are 30 year olds fighting for a better, more accountable India. We have nothing to lose. You can arrest us, beat us, even kill us.
But you cannot stop us.
“अगर मार भी दिया तो हमारी चिता से निकलने वाली आग तुम्हारे महलों को पिघला देगी।”
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) October 5, 2026
आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, अनेक सूत्रांकडून त्यांना अशी माहिती मिळाली आहे की, अभिजीत दीपके, सौरव दास आणि स्वतः रांका यांना १० ऑक्टोबरपूर्वी NSA किंवा तत्सम कायदेशीर तरतुदींअंतर्गत अटक केली जाऊ शकते. त्यांनी पुढे आपण तिघेही तुरुंगात जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
१० ऑक्टोबरला नेमकं काय होणार?
CJPने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरसह देशातील विविध ठिकाणी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेविरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं वृत्त आहे.
या आंदोलनापूर्वीच CJPच्या प्रमुख नेत्यांनी अटकेची शक्यता व्यक्त केल्याने वातावरण तापलं आहे. अभिजीत दीपके यांनीही अटकेच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना, UAPA, NSA किंवा तुरुंगवासाची भीती दाखवून आंदोलन थांबवता येणार नाही, असा दावा केला आहे.





