मुंब्रयातील 25 तब्लिगींना जामीन मंजूर

ठाणे : मरकजप्रकरणी पोलिसांनी मुंब्रा येथून 25 तब्लिगींना ताब्यात घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या सर्वांचा आज क्वारंटाईनचा कालावधी संपला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेकडून करण्यात आली.
मुंब्रा डायघर येथील अटक करण्यात आलेल्या 25 तब्लिगींना गुन्हे शाखेने आज कोर्टात हजर केले असता कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मरकज येथून आल्यानंतर हे 25 जण मदरसा आणि शाळेत राहिले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे रिपोट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये काही बांग्लादेश आणि मलेशियाचे नागरिक आहेत.
मुंब्रयातील अल नदिउल फला या शाळेच्या चार विश्वास्थावर 8 परकीय नागरिक आणि 2 भारतीय यांची कोणतीही परवानगी न घेता ठेवल्याचा आरोपाखाली तसेच तन्वीय उल उलूल मदर्सच्या विश्वास्थनावरदेखील 13 परकीय नागरीक ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्याच्या मुब्रा भागातील एका मशिदीमधून 14 बांग्लादेशी आणि 2 आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीतून 8 मलेशियाच्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले होते. यातील काही जण 10 मार्चला निजामुद्दीन या ठिकावरुन आले होते.





