Harshwardhan Sapkal : धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान केला; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
आध्यात्मिक प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांशी जोडून त्यांचा अपमान केल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला.

Harshwardhan Sapkal : आध्यात्मिक प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांशी जोडून त्यांचा अपमान केल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला.
एका पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना एकमेकांशी जोडू नका. ते वेगवेगळ्या काळातील आहेत.
इतिहासाची मोडतोड करण्याचा हा भाजपचा एक प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय धोरणच असल्याचा आरोप त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही अनादर महाराष्ट्र जनता कदापि सहन करणार नाही. धीरेंद्र शास्त्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे.
शास्त्री यांनी ही अत्यंत आक्षेपार्ह विधाने या नेत्यांच्या उपस्थितीतच केली असली, तरीही त्यापैकी कोणीही साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशभरात वंदनीय आहेत. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र आणि राष्ट्र या दोघांनाही दिशा दिली आहे, असे सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले.






