Devendra Fadnavis : रिक्षा-टॅक्सी चालकांना अतिरिक्त वेळ दिला जाईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट
मराठी शिकण्यासाठी आणि व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी चालकांना आवश्यक असल्यास अतिरिक्त वेळ दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने अनिवार्य केलेल्या मराठी भाषेच्या ज्ञानाचा उद्देश केवळ मूलभूत संवाद साधता येणे हाच आहे. त्यांना मराठीत तज्ज्ञ बनवणे हा नाही.
तसेच मराठी शिकण्यासाठी आणि व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी चालकांना आवश्यक असल्यास अतिरिक्त वेळ दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.
महाराष्ट्र परिवहन विभागाने २० ऑगस्टपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान आहे की नाही, हे तपासण्याची राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. तसेच भाषेच्या आधारावर कोणावरही अन्याय झाल्यास राज्य सरकार ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी (Devendra Fadnavis) दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चालकांना मराठीत तज्ज्ञ बनवण्याचे काहीच कारण नाही. त्यांना केवळ कामाशी संबंधित, मूलभूत मराठी भाषा अवगत असावी. ही भाषा शिकण्यासाठी चालकांना आधीच अतिरिक्त वेळ देण्यात आला असून, आतापर्यंत कोणाचेही परवाना (लायसन्स) रद्द करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी (Devendra Fadnavis) सांगितले.






