Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांच्या कानशिलात मारणारे ‘ते’ तरुण पोलिसांच्या ताब्यात; कोण आहेत VIDEO पाहा..
दिपकेंचा स्कार्फ ओढून त्यांना कानशिलात लगावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. चारवेळी त्यांना तोंडावर मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

Abhijeet Dipke | Cockroach Janata Party – नीट परीक्षेतील कथित पेपर लीक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जयपुरात आयोजित करण्यात आलेल्या एका आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना काही जणांनी कानशिलात मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
जयपुरमधील शहीद स्मारक येथे तरुणांच्या विविध प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण एकत्र आले होते.
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित दिपके हे आंदोलनस्थळी पोहोचले तेव्हा त्यांचे समर्थक त्यांना उत्साहाच्या भरात खांद्यावर उचलून घेत होते.
त्याच वेळी गर्दीत उपस्थित असलेल्या काही अज्ञात तरुणांनी त्यांना अचानक थप्पड मारली. या घटनेनंतर दिपके यांच्या संतप्त समर्थकांनी संबंधित आरोपींना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हातात भ्रष्टाचार आणि पेपर लीक विरोधी घोषणांचे फलक धरले होते.
तसेच परीक्षांमधील कथित गोंधळाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांची चौकशी केली जात आहे. त्यांना विधायकपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दिपकेंचा स्कार्फ ओढून त्यांना कानशिलात लगावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. चारवेळी त्यांना तोंडावर मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. त्यांना समर्थकाच्या खांद्यावरुन खाली ओढण्याचा प्रयत्न देखील झाल्याचा दावा केला जात आहे.
ही बातमी वाचा… Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावली; हल्ला करणारा तरुण कोण होता?
‘अभिजीत दीपके’ कोण आहे?
मूळचा महाराष्ट्रातील असलेला अभिजीत दीपके हा तरूण अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. मात्र अलीकडेच सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीशांच्या टीप्पणीमुळे भारतात कॉक्रोच जनता पार्टी नावारुपाला आली.
या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करणारा तरूण अभिजीत दीपके आहे. २०२०-२०२३ या काळात अभिजीत आम आदमी पक्षाशी संबंधित असल्याचं बोलले जाते. मात्र कॉक्रोच जनता पार्टीमुळे अभिजीत दीपके देशात नावारुपाला आला.
बेरोजगारी, शिक्षण, परीक्षा व्यवस्था आणि युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्याने बनवलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम पेजला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला होता.






