Abhijeet Dipke : कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली.! अभिजीत दिपके सोबत काय घडलं? घटनेचा पहिला VIDEO पाहाच…
यावेळी गर्दीत ३ युवक तिथे पोहचले, त्यातील एकाने पुढे होत अभिजीत दीपकेच्या कानफाडात मारली. त्यानंतर दीपकेवर सातत्याने मारहाणीचा प्रयत्न केला.

Abhijeet Dipke | Cockroach Janata Party : मागच्या काही दिवसांपासून देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच पार्टीने आता सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. कारण सरकारच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतायंत. मात्र तरीही सरकारमधील मंत्री राजीनामे द्यायला तयार नाही, अशी सडकून टीका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे.
दरम्यान, अश्यातच जयपूरमधील आंदोलनावेळी अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि विधायकपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशिलात लगावल्या. आणि त्यांच्या शर्टची कॉलर देखील खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नवी दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दीपके याने पुण्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले. त्यानंतर आज जयपूर येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दीपके आंदोलनस्थळी पोहचला होता.
यावेळी गर्दीत ३ युवक तिथे पोहचले, त्यातील एकाने पुढे होत अभिजीत दीपकेच्या कानफाडात मारली. त्यानंतर दीपकेवर सातत्याने मारहाणीचा प्रयत्न केला. बेरोजगारी आणि परीक्षांमधील गोंधळाचा निषेध करण्यासाठी तरुणांनी या पक्षाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात केली होती.
हे देखील वाचा : Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावली; हल्ला करणारा तरुण कोण होता?
पक्षाचे जंतर मंतरवर पहिले आंदोलन
कॉकरोच जनता पक्षाने सुरुवातीपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (6 जून) जंतर मंतरवर आपले पहिले आंदोलन केले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.
पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले. याशिवाय, देशभरातील विद्यार्थी आणि प्रख्यात अभियंता, शिक्षण सुधारक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.






