Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावली; हल्ला करणारा तरुण कोण होता?
जयपूरमधील शहीद स्मारकावर कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सोमवारी आंदोलन करत होते. याचदरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी एका तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

Abhijeet Dipke : मागच्या काही दिवसापासून देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच पार्टीने आता सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. कारण सरकारच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतायंत. मात्र तरीही सरकारमधील मंत्री राजीनामे द्यायला तयार नाही, अशी सडकून टीका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे.
दरम्यान, अश्यातच अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. (Abhijeet Dipke)
समोर आलेल्या माहितीनुसार जयपूरमधील शहीद स्मारकावर कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सोमवारी आंदोलन करत होते. याचदरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी एका तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
त्या तरुणाने अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावल्या. हल्ल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. (Abhijeet Dipke)
हे देखील वाचा: Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावली; हल्ला करणारा तरुण कोण होता?
यावेळी अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, हल्ला करणारा तो तरुण नेमका कोण होता याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि विधायकपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पक्षाचे जंतर मंतरवर पहिले आंदोलन (Abhijeet Dipke)
कॉकरोच जनता पक्षाने सुरुवातीपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (6 जून) जंतर मंतरवर आपले पहिले आंदोलन केले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.
पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले. याशिवाय, देशभरातील विद्यार्थी आणि प्रख्यात अभियंता, शिक्षण सुधारक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.






