Sai Tamhankar : “काही जणांना झोंबलं…”; प्राजक्ता माळीच्या ‘कान्स’ लुकवर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया
Sai Tamhankar : सई ताम्हणकरने प्रतिक्रिया देत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले

Sai Tamhankar : अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर मराठमोळ्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी त्याच्या या लुकची स्तुती केली तर काहींंनी तिच्यावर टीका केली.
तिने अंगप्रदर्शन केल्याचं काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. यावर अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रतिक्रिया देत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
एका मुलाखतीत सई ताम्हणकर म्हणाली, “प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने, ज्या ग्रेसने ‘कान’च्या रेड कार्पेटवर स्वत:ला कॅरी केलं ते मला खूप आवडलं. काही जणांना ते झोंबलं जरी असलं तरी ते एका अर्थी चांगलंच झालं. कारण याचा अर्थ तिच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं. (Sai Tamhankar)
मला वाटतं कोणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काहीही झालं तरी लोक बोलणारच आहेत. तुम्ही गेलात काय आणि नाही गेलात काय, चर्चा होणारच आहे.” (Sai Tamhankar)
ती पुढे म्हणाली, “मला माझ्या एखाद्या सिनेमाच्या सादरीकरणासाठी ‘कान्स’ला जायला आवडेल. मला जितकं माझं काम आवडतं तितकंच मी फोटोशूटही एन्जॉय करते. कोणाला ते आवडतं तर कोणाला ते खर्चिकही वाटतं. मला मात्र असे प्रयोग करण्याची भीती वाटत नाही. हेच माझ्या कामात, फोटोशूट आणि स्टाईलमध्ये उतरतं आणि उठूनही दिसतं.” (Sai Tamhankar)
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने मराठी चित्रपट ‘तुंबाडची मंजुळा’ सिनेमात दिसणार आहे. ५ जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :






