Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या बारामतीच्या राजकारणात चांगलेच अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामतीमध्ये रोहित पवार यांच्या वतीने ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा जनता दरबार आज दुपारी 3 वाजता बारामतीतील शारदानगर येथील ‘आप्पासाहेब पवार सभागृहात’ पार पडणार आहे. या माध्यमातून रोहित पवार नागरिकांशी थेट संवाद साधणार असून स्थानिकांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या वतीने देखील जनता दरबार भरवण्यात येत आहेत. (Rohit Pawar) अशातच आता रोहित पवार यांनी देखील बारामतीमध्ये जनता दरबाराचे आयोजन केल्याने आत्तापासूनच २०२९ ची तयारी तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे. खरंतर बारामती हा अनेक वर्षांपासून ‘पवार’ कुटुंबाचा आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी बारामतीत वाढवलेली सक्रियता राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. Rohit Pawar : ‘ते’ वक्तव्य अन् आता बारामतीत जनता दरबार; रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? चर्चांना उधाण त्यामुळे बारामतीच्या राजकारणात आता ‘नवा दादा’ तयार होत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये थेट राजकीय लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेत देणारे विधान केले होते. त्यामुळे आजचा जनता दरबार हा आगामी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग आहे का, याबाबत देखील चर्चा होत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन टोला (Rohit Pawar) दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरूनही रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची तुलना ‘मेलोडी’ चॉकलेटशी करत सरकारवर जोरदार निशाणा साधला. “दर तीन-चार दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत १ रुपयांची वाढ होत आहे. पुढील काळात ही वाढ प्रति लिटर ५० रुपयांपर्यंत गेली तरी आश्चर्य वाटणार नाही,” असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला. हेही वाचा : Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”