Pune News : रिक्षाचालकांना मिळणार दहा हजार सन्मान निधी
यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच, वाहन परवाना, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.

Pune News – धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या विविध फायदेशीर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अधिकृत संकेतस्थळावर आपल्या वाहनांची व स्वत:ची ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.
आनंद दिघे कल्याणकारी मंडळातर्फे ज्या सभासदांनी १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत, तसेच ज्यांनी १ मे, २०२६ पर्यंत या कल्याणकारी मंडळांतर्गत यशस्वीरीत्या ऑनलाइन सभासद नोंदणी पूर्ण केली आहे, अशा पात्र सभासदांना सन्मान निधी योजनेअंतर्गत १० हजार रुपये इतका आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
मंडळाचे सभासद होण्यासाठी अर्जदाराकडे खालील वैध कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच, वाहन परवाना, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.






