Pune News : ताम्हिणी घाटात १,२०० फूट खोल दरीत बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह सापडला
Pune News : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील व्यावसायिक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह ताम्हिणी घाटातील सुमारे १,२०० फूट खोल दरीत सापडला आहे.

Pune News : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगावचे व्यावसायिक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात सापडला. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. शोधादरम्यान त्यांची कार सुमारे १,२०० फूट खोल दरीच्या तळाशी आढळली. (Pune News)
पोलिसांनी बेंडखळे यांच्या कारचे ठिकाण शोधले असता ती ताम्हिणी घाट परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर शोध पथके दरीत उतरली. तिथे त्यांना कार आणि बेंडखळे यांचा मृतदेह आढळला. (Pune News)
दुर्गम भागामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. एसव्हीआरएसएस आणि शेलार मामा बचाव पथकाच्या सदस्यांनी मृतदेह दरीतून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पौड पोलिसांच्या ताब्यात दिला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. (Pune News)
Pune News : कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक
Pune News : पांगारे खून प्रकरणाचा ७ तासांत छडा; शिरवळच्या डोंगराळ भागातून आरोपीला अटक





