Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपतीला ५५१ पदार्थांचा अन्नकोट
Dagdusheth Ganpati:

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजन
Dagdusheth Ganpati: गोड, तिखट, आंबट, खारट अशा चवींचे पदार्थ…मिठाई आणि विविध प्रकारच्या फळांचा मिळून ५५१ पदार्थांचा अन्नकोट नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीला मंगळवारी दाखवण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित केला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. तोरण, फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजवण्यात आला होता.
बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो. महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटसाठी भाविकांनी ५५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ दिले होते.
हे सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून हे पदार्थ दिले जातात, असे ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.





