Bhupendra Patel : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजाकडून गौरव
श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांचा पारंपरिक पद्धतीने गौरव करण्यात आला.

Bhupendra Patel : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांचा पारंपरिक पद्धतीने गौरव करण्यात आला. समाजाच्या वतीने त्यांना राधा-कृष्णाची मूर्ती, शाल आणि पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री पटेल (Bhupendra Patel) यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत, समाजाची एकजूट आणि सेवाभावी वृत्ती हीच संस्थेच्या शताब्दी वाटचालीमागील खरी ताकद असल्याचे सांगितले.
या सन्मान सोहळ्यास श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शहा, कार्यकारी संचालक डॉ. राजेश शहा, उपाध्यक्ष वल्लभाई पटेल, सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू, सचिव राजेंद्र शहा, खजिनदार हरेश शहा, सुजय शहा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पुण्यातील मोठ्या संख्येने गुजराती समाजबांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. समाजातील ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि युवकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सन्मानानंतर मुख्यमंत्री पटेल यांनी या प्रसंगी उपस्थित असलेल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला.
खेळाडूंचा उत्साह वाढवताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ संकल्पनेला पुढे नेण्यात अशी क्रीडा केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवान खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे सेंटर एक मैलाचा दगड ठरेल.”
त्यांनी (Bhupendra Patel) खेळाडूंना कठोर परिश्रम करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच गुजरात भवन आणि जयराज स्पोर्ट कन्व्हेन्शन सेंटरची पाहणी करून संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.






