Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत
Pune : या भव्य शुभारंभाचे औचित्य साधून चंदुकाका सराफ यांनी ग्राहकांसाठी बक्षिसांची मोठी पर्वणी आणली आहे

पुणे : १८२७ पासून सुवर्ण परंपरेचा वारसा जपणारे आणि पिढ्यानपिढ्या ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले महाराष्ट्रातील नामांकित नाव ‘चंदुकाका सराफ’ आता चाकण आणि तळेगांव दाभाडे शहरात दाखल होत आहेत. शारदा प्लॅटिनम, ग्रँड सेंट्रलजवळ, पुणे-नाशिक हायवे, चाकण येथे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आणि भंडारी हॉस्पिटल समोर, पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६सकाळी ११:०० वाजता या नवीन भव्य शोरूमचा शुभारंभ संपन्न होणार आहे.
या भव्य शुभारंभाचे औचित्य साधून चंदुकाका सराफ यांनी ग्राहकांसाठी बक्षिसांची मोठी पर्वणी आणली आहे. यामध्ये भाग्यवान ग्राहकांना १४ आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये टाटा टियागो कार, बुलेट बाईक, ज्युपिटर स्कूटर, मोबाईल आणि गिफ्ट व्हाउचर्स अशा एकूण १४ बक्षिसांचा समावेश आहे.
या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ फ्लॅट ६.९९%, तर हिऱ्यांच्या दागिन्यांची घडणावळ ०% असणार आहे.
या सुवर्ण सोहळ्यांचा आणि विशेष सवलतींचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.





