Pune : 450 दृष्टीबाधितांना दिवाळी शिधा वाटप
Pune : द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० दृष्टीबाधितांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.

Pune : द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर व परिसरातील ४५० दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. नांदेड फाटा, सिंहगड रस्त्यावरील शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात हा कार्यक्रम झाला. यावेळी दृष्टीबाधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, रोटरी क्लब पुणे शनिवार वाडाचे अध्यक्ष दिनेश जोशी, प्रकल्प संचालक श्रीनिवास पाळंदे, नारायण चांडक आणि अभिनव सेवा फौंडेशनचे सुनील गोवर्धन उपस्थित होते. काश्मिरा ठाकर व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
दृष्टीबाधित व्यक्तींची दिवाळी आनंदात जावी, यासाठी हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबविला जात आहे. द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन १९५२ पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक दृष्टीबाधित व्यक्ती संस्थेच्या विविध प्रकल्पांचा लाभ घेत आहेत.





