Chitale Bandhu : यंदाच्या दिवाळीत आपुलकीची गोड भेट – चितळे बंधूंचे खास गिफ्ट बॉक्स
यंदाच्या दिवाळीत ही परंपरा अधिक खास करण्यासाठी चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu) घेऊन आले आहेत आकर्षक दिवाळी गिफ्ट बॉक्सेस.

Chitale Bandhu : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, फराळाची चव आणि आपल्या माणसांना भेटण्याचा खास सण. या सणात नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी आणि प्रियजनांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. यंदाच्या दिवाळीत ही परंपरा अधिक खास करण्यासाठी चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu) घेऊन आले आहेत आकर्षक दिवाळी गिफ्ट बॉक्सेस.
गेली अनेक वर्षे आपल्या अस्सल चवीने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या चितळे बंधूंच्या या गिफ्ट बॉक्सेसमध्ये गोड पदार्थ आणि खमंग फराळाचा छान मेळ साधण्यात आला आहे.
काजू कतली, बेसन लाडू आणि गुलाबजाम यांसारख्या मिठाईसोबतच प्रसिद्ध बाकरवडी, शंकरपाळी, चिवडा आणि चकली अशा आवडीच्या पदार्थांचाही यात समावेश आहे. काही बॉक्सेसमध्ये (Chitale Bandhu) चीज बाकरवडीसारखी वेगळी चव अनुभवण्याची संधीही मिळते.
‘उपहार बॉक्स’, ‘फेस्टिव्ह ट्रीट्स’, ‘दिवाळी फराळ बॉक्स’, ‘रॉयल डिलाइट’, ‘रॉयल कार्निव्हल’ आणि ‘फेस्टिव्ह फिएस्टा’ अशा विविध पर्यायांमधून आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार गिफ्ट बॉक्स निवडता येईल. ₹२९९ पासून सुरु होणारे हे पर्याय दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी एक उत्तम निवड ठरु शकतात.
आपल्या सणाचा आनंद इतरांसोबत वाटण्यातच दिवाळीचे खरे सौंदर्य आहे. आपल्या माणसांना चविष्ट पदार्थांची भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी चितळे बंधूंचे दिवाळी गिफ्ट बॉक्स (Chitale Bandhu) नक्की निवडा.
चितळे बंधू मिठाईवाले प्रत्येक भेटीत चवीची आणि आपुलकीची गोडी !






