क्राइम थ्रिलर चित्रपटात झळकणार तापसी पन्नू

चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी गतवर्षी आपल्या एका नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट महिला केंद्रित असेल आणि कृती सेनन ही मुख्य नायिकेची भूमिका साकारणार होती. परंतु तारखा नसल्यामुळे क्रितीने हा चित्रपट सोडला आहे. आता राहुलला त्याच्या या चित्रपटासाठी एक नवीन चेहरा मिळाला आहे.
या चित्रपटामध्ये आता तापसी पन्नूला साइन केले गेले आहे. कृति सेनन बाहेर पडल्यानंतर राहुलने सारा अली खानला अप्रोच केले होते. पण तिनेही नकार दर्शविल्या यानंतर तापसी पन्नूला ऑफर दिली आणि तिला चित्रपटाची पटकथा खूप आवडली.
या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी तापसीने होकार दर्शविला असून आता शूटिंगची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. कारण तापसी पन्नू सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. यात “हसीन दिलरुबा’, “रश्मी रॉकेट’, “शाबास मिट्टू’, “लूप लपेटा’ आणि “मिताली राजच्या बायोपिकचा समावेश आहे.





