Elon Musk : भारताने एलॉन मस्क यांचा स्टारलिंक रोखल्याचा दावा फेटाळला
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक्सवर आरोप केला होता की, भारतीय बाजारपेठेवरील आपली एकाधिकारशाही टिकवून ठेवण्यासाठी काही मोठे उद्योगपती स्टारलिंकला रोखत आहेत.

Elon Musk : सर्व सॅटकॉम कंपन्यांना समान नियामक आणि सुरक्षा निकषांचे पालन करावे लागते. देशातील दूरसंचार आणि उपग्रह सेवांसाठी भारतातील परवाना प्रणाली न्याय्य आणि भेदभाव न करणारी आहे.
या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, तिन्ही परवानाधारक कंपन्यांबाबत सध्या सुरक्षा तपासणी सुरू आहे, असे दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट करत एलॉन मस्क (Elon Musk) यांचा आरोप भारताने गुरुवारी फेटाळून लावला.
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक्सवर आरोप केला होता की, भारतीय बाजारपेठेवरील आपली एकाधिकारशाही टिकवून ठेवण्यासाठी काही मोठे उद्योगपती स्टारलिंकला रोखत आहेत. यावर दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी म्हणाले, या नियमांची अंमलबजावणी निवडकपणे केली जात असून एलॉन मस्क यांचा कोणताही दावा निराधार आणि चुकीच्या समजेवर आधारित आहे.
केंद्र सरकारने तीन कंपन्यांना म्हणजे मस्क यांची स्टारलिंक, रिलायन्स जिओचा उपग्रह उपक्रम जिओ सॅटकॉम आणि भारती समूहाचा पाठिंबा असलेली यूटेलसॅट वनवेब यांना परवाने दिले आहेत. परंतु आवश्यक सुरक्षा तपासणी आणि स्पेक्ट्रम-संबंधित मंजुरी पूर्ण होईपर्यंत यापैकी कोणतीही कंपनी व्यावसायिक सेवा सुरू करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा विषय गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे आणि तो कोणत्याही एका विशिष्ट कंपनीपुरता (Elon Musk) मर्यादित नाही. दूरसंचार विभागाने सर्व सॅटकॉम कंपन्यांना परवाने तसेच तात्पुरते स्पेक्ट्रम जारी केले आहेत. आता सुरक्षा मंजुरीसाठी हा विषय गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. एकदा का ती मंजुरी मिळाली की, त्यांना त्या सेवा मिळतील. याचा कोणत्याही एका विशिष्ट कंपनीशी संबंध नाही, असे पेम्मासानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.






