UPI : यूपीआयवर शुल्क लागू करण्याची तारीख पुढे ढकलली? आता थेट 1 जानेवारीपासून….
UPI : यूपीआय व्यवहारांवरील MDR १५ ऑक्टोबरऐवजी १ जानेवारी २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे. ४० लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना सूट मिळू शकते.

UPI : यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. १५ ऑक्टोबरऐवजी आता १ जानेवारी २०२७ पासून MDR लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमसपर्यंतच्या सणासुदीच्या काळात यूपीआयद्वारे होणारे पेमेंट पूर्वीप्रमाणेच मोफत राहण्याची शक्यता आहे.
भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाच्या (NPCI) नेतृत्वाखालील यूपीआय आणि सेवा संचालन समितीच्या सदस्यांनी आज MDR लागू करण्याच्या तारखेसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली.
दरम्यान, वर्षाला ४० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना MDR मधून सूट देण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.





