Khavdya Dongar Case : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट ! कुणालच्या आजोबांचा हादरवणारा खुलासा
दहावीत ९२ टक्के गुण मिळवणारा, स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ असलेला १९ वर्षीय कुणाल चांदगुडे अचानक खवड्या डोंगरावर (Khavdya Dongar Case) गेला अन् त्याने दरीत थेट उडी घेतली.

Khavdya Dongar Case : दहावीत ९२ टक्के गुण मिळवणारा, स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ असलेला १९ वर्षीय कुणाल चांदगुडे अचानक खवड्या डोंगरावर (Khavdya Dongar Case) गेला अन् त्याने दरीत थेट उडी घेतली.
मुलाला वाचवण्यासाठी धावलेले वडील आणि डोळ्यांदेखत हे भयानक दृश्य पाहून क्षणाचाही विचार न करता दरीत उडी घेणाऱ्या आई संगीता… एका क्षणात एकाच घरातील तीन जीवांचा असा दुर्दैवी अंत सीसीटीव्हीत कैद झाला आणि संपूर्ण परिसर सुन्न झाला.
सुरुवातीला ‘आयफोन’च्या हट्टापायी वडिलांशी झालेल्या वादातून कुणालने (Khavdya Dongar Case) हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली; मात्र या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमागील खरे सत्य काही वेगळेच असल्याचे आता समोर आले आहे.
कुणालच्या आजोबांनी (संगीता यांचे वडील) या घटनेमागील धक्कादायक वास्तव उघड केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कुणालला कोणताही महागडा फोन नको होता; तर आई-वडिलांमधील दुरावा संपवून त्यांनी एकत्र यावे, ही त्याची एकमेव जिद्द होती.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वडिलांना आत्याने त्यांच्यापासून दूर केल्यामुळे, बापाला पुन्हा कुटुंबाशी जोडण्याच्या आणि जवळ आणण्याच्या भावनिक आक्रोशातून तो त्या कड्यावर उभा होता.
दरम्यान, या कौटुंबिक कलहावर कुणालच्या (Khavdya Dongar Case) आत्याने वेगळाच दावा केला असून, गेल्या चार महिन्यांपासून तो आपल्या संपर्कात असल्याने त्याला घरातून काढले होते आणि तो गाडीतच राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नात्यांमधील हाच गुंता एका क्षणात हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत ठरल्याचे आता स्पष्ट होत आहे.






