Kolhapur News। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 तीन नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. चंदगड नगरपंचायतीमध्ये सुनील कावनेकर यांचा विजय झाला आहे. कावनेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या कागलमध्ये पहिला कल हाती आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आघाडीवर आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सविता माने आघाडीवर तर मुरगुड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील आघाडीवर असल्याचे समोर येतंय. Kolhapur News। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुहासिनी पाटील आघाडीवर असून तिकडे चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कावनेकर त्यांचा विजय झाला आहे. जयसिंगपूर मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर आघाडी 2800 मतांनी आघाडीवर आहेत. Kolhapur News।