Swanandi Sardesai: स्वानंदी सरदेसाई झाली नवरी; पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मनं
Swanandi Sardesai स्वानंदीने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्न केलं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत “श्री. व सौ.” अस कॅप्शन दिल आहे. या पोस्टमधून तिच्या लग्नाची माहिती समोर आली. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे.

Swanandi Sardesai: लोकप्रिय यूट्यूबर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई (Swanandi Sardesai ) हिने नुकतच तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. स्वानंदी लग्नबंधनात अडकली असून, तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वानंदीने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्न केलं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत “श्री. व सौ.” अस कॅप्शन दिल आहे. या पोस्टमधून तिच्या लग्नाची माहिती समोर आली. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे.
या लग्नात स्वानंदीचा पारंपरिक मराठमोळा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिने हिरव्या रंगाची साधी पण आकर्षक नऊवारी साडी नेसली होती. साडीला सोनेरी बॉर्डर असून त्यावर तिने सोनेरी ब्लाऊज परिधान केला होता. यासोबतच तिने पारंपरिक दागिन्यांची निवड केली होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात चिचंपेटी आणि तनमणी, नाकात नथ, कानात झुमके आणि गळ्यात मंगळसूत्र असा तिचा पूर्ण लूक होता. कपाळावर चंद्रकोर लावून तिने आपला नवरीचा लूक पूर्ण केला. Swanandi Sardesai

Swanandi Sardesai: स्वानंदी सरदेसाई झाली नवरी; पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मनं
स्वानंदीप्रमाणेच तिच्या पतीनेही पारंपरिक पोशाखाची निवड केली होती. त्यांनी पांढऱ्या रंगाचं धोतर, सदरा आणि शेला परिधान केला होता. या दोघांनीही साधेपणाला प्राधान्य देत पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याचं दिसून आलं. त्यांच्या फोटोंमधून एक साधं, सुंदर आणि मराठमोळं लग्न पाहायला मिळत आहे.
स्वानंदी सरदेसाई ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर कोकणातील निसर्ग, संस्कृती आणि दैनंदिन जीवनावर आधारित व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. तिच्या साध्या आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ती चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकली आहे.
फक्त यूट्यूबरच नाही तर स्वानंदी एक गुणी गायिकाही आहे. तिने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ या चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. तिच्या आवाजालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
एकूणच, स्वानंदी सरदेसाईच्या लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची ठरली आहे. तिचा साधा आणि पारंपरिक लूक, तसेच मराठमोळ्या पद्धतीने पार पडलेला विवाह सोहळा यामुळे ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.





