खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची जबरदस्त मोर्चेबांधणी. ZP Election 2026 – अकलूज: जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माळशिरस तहसिल कार्यालय येथे विविध पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विद्यमान आमदार उत्तम जानकर, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी फोंडशिरस जिल्हा परिषद गट आणि गुरसाळे पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. Dhairyasheel Mohite Patil पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी यशवंतनगर पंचायत समिती गणासाठी, माजी पंचायत समिती सदस्य गौतम माने यांनी जिल्हा परिषद मांडवे गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आमदार उत्तम जानकर यांच्या पत्नी विमल जानकर यांनी जिल्हा परिषदेसाठी फोंडशिरस मधून तर पंचायत समितीसाठी वेळापूर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जानकर यांचे सुपूत्र जीवन जानकर यांनी जिल्हा परिषदेसाठी दहीगाव गटातून, निमगाव जिल्हा परिषद गटासाठी माजी सभापती मच्छिंद्र ठवरे यांच्या पत्नी नीलावती ठवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच खुडूसचे माजी सरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांच्या पत्नी सुवर्णा ठवरे यांनी निमगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषद गटासाठी दाखल अर्ज – एकुण ९४ अर्ज दहीगाव ९, मांडवे १४, फोंडशिरस ११, संग्रामनगर १४, माळीनगर ११, बोरगाव ९, वेळापूर ८, निमगाव ९, पिलीव ९ पंचायत समिती गणासाठी दाखल अर्ज – एकुण १५४ अर्ज गुरसाळे १३, दहिगाव ६ , मांडवे ६, कन्हेर ७, भांबुर्डी ४, फोंडशिरस ६, संग्रामनगर ४, मेडद १५, माळीनगर ८, लवंग ९, बोरगाव ५, जांभुड १०, वेळापूर १५, यशवंतनगर ८, निमगाव १०, गोरडवाडी १३, पिलीव १०, तांदुळवाडी ५,