झेडपीची रंगीत तालीम सहकाराच्या आखाड्यात, दौंडमध्ये 98 सोसायटींच्या निवडणुका दोन महिन्यांतच?

ऍड. नंदकिशोर शेलार
चौफुला – आगामी दोन महिन्यांमध्ये दौंड तालुक्यातील तब्बल 98 सोसायटी निवडणुकीनिमित्त सहकारातील धुरळा उडणार आहे. सहकारामध्ये एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोसायट्यांची निवडणूक होण्याचा इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कुल- थोरात समर्थक समोरासमोर भिडणार आहेत.
करोनामुळे दोन वर्षांत सहकारातील निवडणुकांची लोक”शाही’ पुसट झाली होती. त्यानंतर सहकार विभागाकडून लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुकांचा ताण कमी करण्यास सुरूवात केली आहे. नियोजनप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जात आहे. सध्या येत्या दोन महिन्यांत 98 संस्थांचा आखाडा तापणार आहे. त्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आहे. संस्थांची निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुका या जवळपास एकत्रित होण्याची शक्यता आहे. संस्थांच्या निवडणुका मार्चमध्ये झाल्या तर झेडपीच्या निवडणुका या मेअखेर होण्याची शक्यता आहे.
दौंडच्या सहकारात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांचे प्राबल्य आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तालुक्यात बाजी मारल्यानंतर आमदार राहुल कुल यांना बॅकफूटवर यावे लागले. सध्या सहकार संस्थांच्या निवडणुकीत थोरात- कुल गट आमनेसामने येणार आहे. त्यात सहकार संस्थांच्या निवडणुकापाठोपाठ जिल्हा परिषदेचा आखाडा तापणार आहे. त्यामुळे सहकाराची रंगीत तालीम ही जिल्हा परिषदेला उपयोगी पडणार आहे. दौंड तालुक्यातील होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढीलप्रमाणे- नागेश्वर पाटस, हिंगणी बेर्डी, नानगाव, टेळेवाडी, खेडेकर वस्ती, मसनेरवाडी, आंबेगाव, मलठण, डबेवाडी, आलेगाव, यादववाडी, केडगाव,
डाळिंब, एकेरीवाडी, वाखारी, टाकळी भीमा, बोरीभडक, पिलानवाडी, खोर, उंडवडी, यवत, चिंचोली, जिरेगाव, गलांडवाडी, वरवंड, खुटबाव, हातवळण, पांढरेवाडी, सहजपूर, कौठडी, पारगाव, दौंड, भांडगाव, कुसेगाव, कानगाव, कानगाव, पारगाव, बोरीबेल, पारगाव, वाटलूज, कुसेगाव, गलांडवाडी, गोपाळवाडी, पारगाव, पिंपळगाव, पारगाव सोसायटी, राहू, मळद, दापोडी, नांदूर, बोरिऐंदी,हिंगणीगाडा, गार, देऊळगाव राजे, वडगाव दरेकर, बोरीपार्धी, वासुंदे, सोसायटी, पाटस, कुरकुंभ सोसायटी, कासुर्डी, देलवडी,
भागवतवाडी,नानगाव, खानवटे, राजेगाव, वाळकी, सोनवडी, वरवंड, बिरोबावाडी, खडकी, राहू, केडगाव, रावणगाव, कडेठाण, खामगाव,,खोरवडी, खडकी, पेडगाव, काळेवाडी, गिरीम, शिरापूर, भोसलेवाडी, भरतगाव, नानवीज, भोसलेवाडी, पाटस, यवत स्टेशन सोसायटी, धुमळीचामळा, खानोटा, ताम्हणवाडी, श्री पद्मावती सोसायटी केडगाव, भैरवनाथ केडगाव, हंडाळवाडी सोसायटी, भैरवनाथ वरवंड, गजानन यवत, नंदादेवी सोसायटी, यशोदा माता नानगाव.
गेली 2 वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या होत्या. महिनाभरात 13 संस्थांच्या निवडणुका झाल्या. आता उर्वरित 98 संस्थांच्या निवडणुका आहेत. निवडणुकीनिमित्त 5 निवडणूक निर्णय अधिकारी नेमले असून प्रत्येक आठवड्याला किमान पाच ते दहा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
-हर्षल तावरे, सहायक निबंधक, दौंड.





