सह व्यवस्थापकाने राजीनामा देताच झोमॅटोचा शेअर घसरला
Updated On:

मुंबई – झोमॅटो कंपनीचे सह संस्थापक आणि मुख्यतंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार यांनी राजीनामा दिल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यापर्यंत कोसळून 58 रुपये प्रति शेअर हा पातळीपर्यंत गेला होता.
झोमॅटो कंपनी ऑनलाईन अन्नपुरवठा करते. या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या विकसनामध्ये पाटीदार यांचा मोठा वाटा होता. कंपनीने पाटीदार यांच्या झोमॅटो मधील कामाची स्तुती केली आहे. त्यांनी केवळ तंत्रज्ञान विकसित केले नाही तर ते तंत्रज्ञान हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र पाटीदार यांनी राजीनामा का दिला याचे स्पष्टीकरण करण्यात आले नाही.





