Zohran Mamdani: “माझ्या आईचं कुटुंब भारतात…” भागवतांच्या कार्यक्रमावर ममदानींचा संताप? नेमकं काय घडलं?
Zohran Mamdani: न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर टीकात्मक भाष्य केले आहे.

Zohran Mamdani: न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर टीकात्मक भाष्य केले आहे.
ममदानी यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन याठिकाणी होणाऱ्या भागवत यांच्या नियोजित कार्यक्रमाला विरोध केला. भागवत २९ ऑगस्ट रोजी भारतीय प्रवासी समुदायाच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे ममदानी म्हणाले.
आरएसएसच्या शताब्दी वर्षाच्या जागतिक संपर्क कार्यक्रमाचा भाग म्हणून भागवत अमेरिकेत आले आहेत. न्यूयॉर्कमधील वास्तव्यादरम्यान, ते ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमात सहभागी होतील आणि शनिवारी (२९ ऑगस्ट) मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे सुमारे ५,००० लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ममदानी यांनी पत्रकार परिषदेत, “मी या रॅलीला पाठिंबा देत नाही, परंतु एखादा खाजगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही हे मला माहीत नाही.” असे म्हटले आहे.
भारतीय वंशाच्या महापौरांनी आरएसएस, मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील प्रस्तावित कार्यक्रम आणि त्याविरोधातील आंदोलनांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही टिप्पणी केली. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील रॅली रद्द करावी का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
भारत आणि त्यांच्या आईबद्दल मामदानी काय म्हणाले? Zohran Mamdani:
मामदानी म्हणाले, “मी आमच्या शहराच्या इतिहासातील पहिला भारतीय-अमेरिकन महापौर आहे आणि माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब अजूनही भारतात राहते.” ते म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना मिळालेली आणि ज्या वातावरणात ते वाढले, ती भारताची संकल्पना “एक बहुलवादी समाज आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक, जिथे प्रत्येक भारतीयाला समानतेने स्वीकारले जाते” अशी होती.
मामदानी म्हणाले, “अशा दृष्टिकोनाची चळवळ कोणत्याही देशात उदयास येताना पाहणे अत्यंत त्रासदायक आहे. मी लोकांना वगळणाऱ्या कोणत्याही गोष्टीला विरोध करतो, केवळ एक भारतीय-अमेरिकन म्हणून नाही, तर अशा शहराचा महापौर म्हणूनही, जे शहर प्रत्येक व्यक्तीला, त्यांचा रंग, वंश, धर्म, श्रद्धा किंवा मूळ ठिकाण विचारात न घेता, स्वीकारण्यावर दृढ विश्वास ठेवते.”






