#ZIMvIND 3rd ODI : गिलची शतकी खेळी, भारताचे झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य

हरारे – शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या.
Innings Break!
A brilliant 130 from @ShubmanGill as #TeamIndia post a total of 289/8 on the board.
Scorecard – https://t.co/ZwXNOvRwhA #ZIMvIND pic.twitter.com/sKPx9NzWwi
— BCCI (@BCCI) August 22, 2022
भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. गिलने 97 चेंडूत 130 धावा केल्या. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शुभमन गिलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक आहे.
त्याच्याशिवाय इशान किशनने 50, धवनने 40 आणि कर्णधार राहुलने 30 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक 5 बळी घेतले. न्याउची और जॉन्गवे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा सामना जिंकून त्यांना व्हाइटवॉश देण्याची संधी आहे.





