वसई – जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नवीत हरिश्चंद्र भोईर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला लाखमोलाचा केक कापला आहे. या केकची आणि या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नवीत यांना वाढदिवसाला hyundai verna या कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा 2 लाख 65 हजारांचा केक कापला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीत भोईर हे खिंडपाडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. लग्नाच्या 6 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला होता. मात्र जन्मानंतर त्याला इन्फेक्शन झाल्याने तो अनेक दिवस आजारी होता. भोईर यांनी त्यांच्या मुलाचे नाव रेयांश ठेवले आहे. त्याचा 4 मार्च रोजी वाढदिवस होता. त्यामुळे आपल्या मुलाचा वाढदिवस जंगी स्वरूपात करण्याचे भोईर यांनी ठरविले आणि केक म्हणून चक्क कारची प्रतिकृती तयार करण्यात आली. दरम्यान, या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.