zika virus update : ‘झिका’चे पथक आणखी एक दिवस पुण्यात
Updated On:

पुणे -झिका’ विषाणूची लागण झालेला रुग्ण सापडल्यानंतर आलेल्या केंद्रीय पथकाने बेलसर गावात गुरूवारी भेट दिली. ते त्यांच्या सूचना शुक्रवारी करतील, अशी माहिती साथरोग विभागाचे राज्याचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी केंद्राचे हे पथक पुण्यात आले आहे. पहिल्या दिवशी त्यांनी राज्याचे आरोग्य संचालक, उपसंचालक आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठका घेतल्या. त्यानंतर गुरूवारी त्यांनी बेलसरे गावाला भेट देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली.
शुक्रवारीही ते अन्य गावांमध्ये जाऊन पाहणी करणार असून, त्यानंतर ते सूचना करतील. तसेच त्यानंतर दिल्ली येथे गेल्यानंतर त्यांचा पाहणीचा लेखी अहवाल आणि सूचना पाठवतील असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.




