Zhimma 3 : ‘झिम्मा 3’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; मैत्री, प्रवास, नात्यांमधील गोडवा पुन्हा अनुभवता येणार
Zhimma 3 : झिम्मा ३’मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

Zhimma 3 : ‘झिम्मा’ या चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर ‘झिम्मा २’नेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ‘झिम्मा 3’ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांनी केले असून, अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोग चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
‘झिम्मा ३’मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्या व्यक्तिरेखेबाबत अद्याप सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच चित्रपटातील इतर कलाकारांची संपूर्ण यादीही अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘झिम्मा’च्या आधीच्या दोन्ही भागांना मिळालेले यश पाहता तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मैत्री, प्रवास, नात्यांमधील गोडवा आणि आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदांचा अनुभव पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. (Zhimma 3)

Zhimma 3 : ‘झिम्मा 3’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; मैत्री, प्रवास, नात्यांमधील गोडवा पुन्हा अनुभवता येणार
‘झिम्मा’च्या पहिल्या दोन भागांमधून महिलांची मैत्री, त्यांच्यातील भावनिक नाती, आयुष्यातील संघर्ष आणि स्वतःसाठी जगण्याची उमेद अशा अनेक पैलूंवर भाष्य करण्यात आले होते. हलक्याफुलक्या विनोदासोबत भावनिक प्रसंगांची सांगड दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी उत्तमरित्या केली होती. (Zhimma 3)
त्यामुळेच या चित्रपटाला सर्व वयोगटांतील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता तिसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. येत्या १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





