सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील रूपा भूमिकेसाठी झीनत अमान अशी लढवली शक्कल

जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. राज कपूर आपल्याला सत्यम शिवम सुंदरम चित्रपटात कास्ट करतील यावर विश्वास बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
झीनतने सांगितले की, ‘मी वकिल बाबू या चित्रपटात राज कपूरसोबत काम करत होती. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत होती. त्या काळात राज कपूर सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये खूप व्यस्त होते. वकिल बाबूच्या शूटिंग सेटवर ते सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाबद्दल बोलत असत. या गोष्टींनी मी खूप प्रभावित झाली’
आरके स्टुडिओजवळील एस्सेल स्टुडिओमध्ये शूटिंग केल्यानंतर मी एक दिवस स्वत:ला रूपा बनवण्याचा निर्णय घेतला. घागरा चोली घालून, लांब वेणी बनवत आणि रुपासारख्या टिश्यू पेपरने चेहऱ्यावर जखमा करून मी राज कपूर यांच्या तंबूत पोहोचले. मी आरके स्टुडिओत गेले होते. राज कपूर त्यांच्या तंबूत होते. त्यांनी मला आत यायला सांगितले. मी गेले. अन् मला चित्रपटाच्या वेशभूषेत आणि जळलेल्या चेहऱ्याने पाहून ते आश्चर्यचकित झाले. आणि त्यांनी मला कास्ट केले’
झीनत अमान यांच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, त्यांचा पहिला हलचल या चित्रपटात होता, पण देव आनंद यांच्या हरे राम हरे कृष्णा या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले. त्याचबरोबर त्या मनीष मल्होत्राच्या ‘बन टिक्की’ या चित्रपटातून प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन करणार आहे.





