झीनत अमान यांनी खास कारणासाठी शेअर केली पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

Entertainment : बॉलीवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान या नेहमीच त्यांच्या हटके भूमिकांसाठी ओळखल्या गेल्या आहेत. आजही त्यांचे बोल्ड आणि हटके लूक चर्चेत आहेत. सध्या त्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत त्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. याशिवाय त्या विविध मुद्यांवर आपले परखड मत देखील मांडतात. वयाची 72 वर्षे पूर्ण केल्यानंतर आजही त्यांचा कामबद्दलचा उत्साह कौतुक करण्यासारखा आहे.
अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर फॉलोअर्सची संख्या वाढली असून ही संख्या आता पाच लाखांच्या पुढे गेली आहे. यानिमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. झीनत म्हणतात की, “मला माझे रोमिओ भलेही कुठे दिसत नाही पण माझ्या प्रोफाईलवरील चाहत्यांची, फॉलोअर्सची संख्याही पाहिली की मला माझे उत्तर मिळून जाते. मी एवढ्या फॉलोअर्सशी एकाच वेळी बोलू शकते, संवाद साधू शकते ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.”
“हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन आहे. पण तितकेच ते मला समाधान आणि आनंदही देणारे आहे. आतापर्यतचा सारा प्रवास त्यातून आलेले अनुभव, तो संघर्ष याविषयीच्या कित्येक गोष्टी विषयी बोलावसं वाटते. अशावेळी हे सगळं या माध्यमातून तुम्हाला सांगता येत असल्याने आनंद वाटतो,” अशा आशयाची पोस्ट झीनती यांनी शेअर केली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी झीनत अमान यांनी एका पोस्टमधून तरुण वर्गाला काही महत्वाचे सल्ले दिले होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी पैशांची बचत करुन निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगले पाहिजे. याबाबत त्यांनी सांगितले होते. त्यांच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटसचा वर्षाव केला होता. आताची पोस्ट ही त्यांनी आपण पाच लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला याबद्दल केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले होते.





