अभिनेत्री झीनत अमान रुग्णालयात दाखल; पोस्टद्वारे दिली हेल्थ अपडेट

Zeenat Aman | ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान सोशल मीडियावरद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ब्रेकनंतर त्या पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. झीनत अमान यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची माहिती शेअर केली आहे. याबद्दल त्यांनी इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर हेल्थ अपडेट दिली आहे.
झीनत अमान हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझं प्रोफाइल अलीकडे खूप शांत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मी वैद्यकीय प्रक्रियेत बिझी होते. पण प्रकृती आता सुधारत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या विश्रांती घेत आहेतमी ठीक आहे.लवकरच पोस्ट लिहायला सुरूवात करणार आहे.’
View this post on Instagram
या पोस्टमध्ये झीनत अमान यांनी सोशल मीडियावरून दूर राहण्याचे कारणही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, ‘सध्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला. मला चाहत्यांसोबत संवाद साधण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी काही वेळ लागेल.’ यावेळी त्यांनी चाहत्यांचे आणि प्रियजनांचे आभार मानले आहेत. तसेच चाहत्यांनी देखील तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, झीनत अमान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागील दोन वर्षापासून त्या बॉलिवूडमधील जुन्या आठवणी, अनुभव आणि त्यांच्या खास कथा शेअर करताना दिसतात.
हेही वाचा:





