बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे दिसतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत त्या सोशल मीडियावर पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकतेच त्यांनी डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली आहे. झीनत अमान यांनी रुग्णालयातील एक फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. इतकेच काय तर 40 वर्षांपासून त्या या आजाराचा सामना करत असल्याचे सांगितले आहे.
झीनत यांनी पोस्ट करत लिहिले की, “मला पीटोसिस नावाचा आजार आहे. हा आजार म्हणजे मला अनेक दशकांपूर्वी झालेल्या दुखापतीचा हा परिणाम आहे. यामुळे माझ्या उजव्या डोळ्याभोवतीच्या स्नायूंना इजा झाली. यामुळे माझ्या पापण्या खाली झुकत होत्या आणि काही वर्षांपूर्वी हा आजार इतका गंभीर झाला की मला पाहण्यास त्रास होऊ लागला. मला यामुळे बघायला अडचणी येत होत्या.म्हणूनच मला अनेकदा मला नावंही ठेवली गेली होती.
“माझ्याबद्दल गॉसिप व्हायचे पण मला कधी फरक पडला नाही. तेव्हाही बरेच उपचार केले पण काहीच झालं नाही. पण आता तंत्रज्ञान प्रगत झालं आहे त्यामुळे ही सर्जरी यशस्वी झाली. मला आता नीट दिसत आहे. तसंच हे ऑपरेशन करणं कठीण होतं. माझं शरीर बर्फाने जखडलं गेलं होतं. मी थरथर कापत होते. पण माझा मुलगा जहान माझ्यासोबत होता. त्याने मला शांत केलं.”
View this post on Instagram
पुढे त्यांनी लिहीले की, “जेव्हा एखाद्याचे करिअर त्याच्या लूकवर आधारित असत, तेव्हा त्यात थोडासाही बदल करणं कठीण असतं. मला माहिती आहे की या Ptosis मुळे माझ्या संधी मर्यादित झाल्या. काही लोक नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि तरीही माझ्यासोबत काम करायचं ठरवलं, त्यामुळे माझी मदत झाली. ऑपरेशनवेळी माझं शरीर पूर्णपणे थंड झालं होतं. मला मेडिकल टीमकडे सोपावण्यात आलं. जवळपास एका तासाने मी बाहेर आली. माझ्या डोळ्यावर पॅच होता. आता मी हळूहळू रिकव्हर होत आहे. ऑपरेशननंतर माझी दृष्टी आधीच्या तुलनेत स्पष्ट झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.”