Zaira Wasim : ‘दंगल’ चित्रपटातून चमकलेली जायरा वसीम आता पडद्यापासून दूर; रवीना टंडन झाल्या होत्या नाराज

Zaira Wasim : पहिल्याच चित्रपटातून प्रचंड यश मिळवणारी अभिनेत्री जायरा वसीम आज चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाने जगभरात तब्बल २,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. एवढ्या मोठ्या यशानंतरही जायराने केवळ दोन-तीन चित्रपट केल्यानंतर इंडस्ट्रीला कायमचा निरोप दिला.
‘दंगल’मधून झाला अभिनयात प्रवेश
जायरा वसीमने आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात ती आमिर खानची मुलगी गीता फोगटच्या भूमिकेत दिसली होती. ‘दंगल’ सुपरहिट ठरला आणि त्याने जागतिक स्तरावर तब्बल २,०७० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटासाठी जायराला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. नंतर ती ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झळकली.
धर्माच्या कारणामुळे सोडली इंडस्ट्री
२०१९ मध्ये, वयाच्या केवळ १८व्या वर्षी, जायराने अभिनय क्षेत्र सोडण्याची घोषणा केली होती. तिने सांगितले की, तिच्या धार्मिक श्रद्धा आणि फिल्म इंडस्ट्रीतील काम यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. तिच्या मते, तिचे करिअर तिच्या धर्माच्या आड येत होता. त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीपासून कायमच दूर जाण्याचा निर्णय घेतला.
रवीना टंडन झाल्या होत्या नाराज
जायराच्या या निर्णयामुळे अनेक चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनाही धक्का बसला होता. अभिनेत्री रवीना टंडन यांनी त्या वेळी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी एका पोस्टमध्ये जायरावर टीका केली होती, मात्र नंतर आपला ट्वीट डिलीट करून माफी मागितली.
आज जायराने प्रकाशझोतातून पूर्णतः दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सात वर्षांपासून ती सार्वजनिक ठिकाणी दिसलेली नाही, पण तिच्या अभिनयाची आणि विचारांची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे.





