IPL 2025 : झहीर खानचे आयपीएलमध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्सने सोपविली मोठी जबाबदारी…

Zaheer Khan in IPL 2025 with LSG : इंडियन प्रीमियर लीग 2025 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा बदल केला आहे. लखनऊने टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू झहीर खानला संघाचा मार्गदर्शक (mentor) म्हणून नियुक्त केले आहे. झहीरची क्रिकेट कारकीर्द चमकदार आहे. निवृत्तीनंतरही तो कोणत्या ना कोणत्या संघाशी जोडला गेला आहे. आता तो लखनौ कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत झहीर दिसत आहे.
Zaheer, Lucknow ke dil mein aap bohot pehle se ho 🇮🇳💙 pic.twitter.com/S5S3YHUSX0
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
झहीरने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर 2017 मध्ये शेवटची स्पर्धा खेळला. यानंतर झहीर खानने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तो 2018 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्ससोबत राहिला. आता तो लखनौसाठी मार्गदर्शकाची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या आधी गौतम गंभीर या पदावर होता. गंभीर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. त्यांच्या जाण्यानंतर लखनौमध्ये मार्गदर्शकाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता झहीर मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Welcome to the Super Giants family, Zak! 💙 pic.twitter.com/0tIW6jl3c1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल नाही..
लखनऊच्या कोचिंग स्टाफबद्दल बोलायचे झाले तर जस्टिन लँगर हे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. अँडी फ्लॉवरच्या जागी ते आले. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. झहीरच्या आगमनानंतर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही. पण झहीर मेंटॉर होण्यासोबतच इतर जबाबदाऱ्या पार पाडणार आहे. तो खेळाडू-विकास कार्यक्रमही (Player-Development Program) आयोजित करू शकतो.
ICC Test Rankings 2024 : आयसीसी क्रमवारीत मोठा बदल ! विराट-यशस्वीला फायदा तर बाबर आझम पडला तोंडघशी…
झहीरची कारकीर्द राहिली आहे दमदार…
झहीरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती शानदार राहिलेली आहे. झहीरने 100 आयपीएल सामन्यात 102 विकेट घेतल्या आहेत. या काळात केवळ 17 धावांत 4 बळी घेणे ही सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. झहीरने भारतासाठी 17 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 282 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी 311 कसोटी विकेट्सही घेतल्या आहेत.





