‘Z+ सुरक्षा घेतो पण…’ शरद पवारांनी केंद्र सरकारसमोर ठेवली अट

Sharad Pawar । राज्यातील काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच नेत्यांचे दौरे वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्याही महाराष्ट्रभर दौरा असणारा आहे. हेच लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी त्यांना देण्यात आलेली Z +सुरक्षा घेण्यास नकार दिला होता आता मात्र पुन्हा एकदा शरद पवार या सुरक्षेबाबत बोलले आहे. त्यांनी केंद्रापुढे सुरक्षा घेण्याआधी काही अति ठेवल्यास असल्याचे समजते आहे.
नुकतीच शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडली आहे. या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.मिळलेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी केंद्रासमोर काही अटी ठेवल्या आहे. केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार आहे. कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार आहे. शिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार आहे.
दरम्यान या अटी शर्थीचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तत्पूर्वी, 21 ऑगस्ट रोजी केंद्राने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. पवार यांच्या झेड प्लस सुरक्षेचा एक भाग म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या 55 सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी नियुक्त करण्यात आली होती. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र त्यांनी आज CRPF अधिकाऱ्यांना परत पाठवले आहे .





