Rohit Sharma 15 Years : ‘रो, तू आमचा सर्वात मोठा…!’ १५ वर्षांच्या प्रवासानंतर हार्दिक पंड्याचं रोहित शर्मासाठी खास भाषण; पाहा VIDEO
Rohit Sharma 15 Years : 'हिटमॅन' रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससोबत आपली १५ वर्षे पूर्ण केली आहेत.

Rohit Sharma 15 Years in Mumbai Indians : रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे नाते आता एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. २०११ मध्ये संघात सामील झालेल्या रोहितने या फ्रेंचायझीसोबत १५ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने रोहितच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हार्दिक पंड्याचा रोहितला ‘सॅल्यूट’ –
हार्दिक आपल्या भाषणात म्हणाला, “रो, १५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुझे अभिनंदन. इतकी वर्षे या फ्रँचायझीचे नेतृत्व केल्याबद्दल तुझे मनापासून आभार. मी, बुमराह आणि आमच्यापैकी अनेकांनी तुझ्या नेतृत्वाखाली पदार्पण केले आहे. आम्हाला आणि देशासाठी खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. तू एक उत्तम माणूस आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचा कर्णधार राहिला आहेस.”
Moment hai bhai, moment hai! 💙 pic.twitter.com/FjAQfOMofY
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2026
रोहित शर्माने मानले आभार –
From a young talent to Mumbai’s heartbeat. 15 years of Ro, and we’re still not over it. 💙 pic.twitter.com/QWIjmlQOa9
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2026
या सन्मानानंतर रोहित शर्मा देखील भावूक झाला होता. तो म्हणाला, “हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. मुंबई इंडियन्सने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून घडलो.” रोहितने यावेळी फ्रँचायझीचे मालक आणि सपोर्ट स्टाफचेही विशेष आभार मानले.
आयपीएलमधील ‘हिटमॅन’चा प्रवास –
२००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून कारकीर्द सुरू करणाऱ्या रोहितने २०११ मध्ये मुंबईत प्रवेश केला. २०१३ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि त्यानंतर त्याने इतिहास घडवला. रोहितने आपल्या १० वर्षांच्या कप्तानीमध्ये मुंबईला ५ वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०) चॅम्पियन बनवले. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने २३९ सामन्यांत ६,२६७ धावा कुटल्या आहेत, ज्यात २ शतके आणि ४१ अर्धशतकांचा समावेश आहे.





