आक्षेपार्ह विधानाबद्दल युवराजवर कारवाई होणार

नवी दिल्ली – सोशल मीडियावर रहित शर्माशी चॅट करताना कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारा भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युवराजसिंग याने माफि मागितली असली तरीही हे प्रकरण संपलेले नसून त्याच्यावर न्यायालयाकडून कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
यादव व चहल यांच्याबद्दल जातीवाचक टीका केल्यामुळे युवराज टीकेचा धनी बनला होता. त्याच्यावर टीका होऊ लागल्याने त्याने या दोन्ही क्रिकेटपटूंची जाहीर माफिही मागितली होती. मात्र, तरीही हे प्रकरण संपलेले नसून सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर न्यायालयाने युवराजविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीचे स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश स्थानिक पोलीसांना देण्यात आले आहेत. कलसन यांनी युवराजने मागितलेली माफि पुरेशी नसून त्याच्यावर भारतीय दंडसंहितेनूसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.





