Yuvraj Singh vs Virat Kohli : सिंक्सर किंग’ आणि ‘किंग कोहली’ यांच्यात दुरावा? युवीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चेला उधाण

Yuvraj Singh got into an argument Rumor : भारतीय क्रिकेट संघाचा किंग म्हणजेच विराट कोहली आणि जागतिक क्रिकेटचा सिक्सर किंग म्हणजेच युवराज यांच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाला आहे का? विराट आणि युवराजमध्ये काही कटूत आलीये का? हे आम्ही म्हणत नाही आहोत. युवराज सिंगच्या सोशल मीडिया पोस्टनंतर हा दावा केला जात आहे. खरंतर, माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने विराट कोहलीला टॅग न करून एका नवीन वादाला जन्म दिला आहे.
युवराज आणि विराटमध्ये बिनसलं?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या मध्ये भारतीय संघ अपराजित राहिला आणि जेतेपद पटकावले. गेल्या १० महिन्यांत दुसऱ्यांदा, टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला. टीम इंडियाच्या या विजयाने माजी क्रिकेटपटूही खूप आनंदी होते. सर्वांनी टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याचे कौतुक केले. विराटसाठी एक वेगळेच वातावरण तयार झाले होते, पण युवराजने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये इतर खेळाडूंचे कौतुक केले पण विराटचा उल्लेख केला नाही. यानंतर दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या.
युवीच्या पोस्टने चर्चेला उधाण –
सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “काय फायनल सामना होता! चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने उत्कृष्ट नेतृत्त्व केले, ज्याने संपूर्ण स्पर्धेत एका चांगल्या लीडरप्रमाणे संघाला हाताळले. आयसीसी स्पर्धांबद्दल बोलायचे झाले, तर रोहित वेगळ्या लयीत असतो.”
What a game and what a final! The Champions Trophy comes home 🏆 Outstanding captaincy by hitman @ImRo45 who led from the front all thru the tournament – he is blessed with the Midas touch ✨ when it comes to ICC white ball tournaments! Successful games for @ShreyasIyer15…
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 9, 2025
युवी पुढे म्हणाला की, “जेव्हा संघ दबावाखाली होता तेव्हा श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी जबाबदारी घेतली. संपूर्ण स्पर्धेत रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी आपली फिरकी जादू दाखवली. मोहम्मद शमीनेही सातत्य दाखवले, पण न्यूझीलंडचे नशीब पुन्हा एकदा वाईट ठरले.”
विशेष म्हणजे युवीने त्याच्या पोस्टमध्ये विराटचा उल्लेख केला नाही किंवा त्याला टॅगही केले नाही, तर सिक्सर किंगने रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी यांना टॅग केले. तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत.





