यू-ट्युबरने रेल्वे ट्रॅकवर फटाके फोडले अन्…!

You tuber Stupid DTX – राजस्थानच्या जयपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जिथे एक Youtuber रेल्वे रुळावर आल्यानंतर फटाके फोडताना दिसला. हा व्हिडिओ उत्तर-पश्चिम रेल्वे मुख्यालयातील रेल्वे पोलिसांनी दिसताच पोलिसांनी कारवाई करत आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. काही वेळानंतर, YouTuber ने त्याच्या खात्यातून हा व्हिडिओ हटवला. मात्र रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
YouTuber bursting crackers on Railway Tracks!!
Such acts may lead to serious accidents in form of fire, Please take necessary action against such miscreants.
Location: 227/32 Near Dantra Station on Phulera-Ajmer Section.@NWRailways @rpfnwraii @RpfNwr @DrmAjmer @GMNWRailway pic.twitter.com/mjdNmX9TzQ— Trains of India 🇮🇳 (@trainwalebhaiya) November 7, 2023
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, स्टुपिड डीटीएक्स नावाच्या यूट्यूब चॅनलवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये फुलेरा-अजमेर दरम्यान, रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी एका तरुणाने उभे राहून सापाची गोळी असलेले फटाके वाजवून रेल्वे रुळांवर धूर निर्माण केला. त्यादरम्यान त्या रुळावरून एकही ट्रेन गेली नाही तर बाजूने एक मालगाडी जात होती.
यश नावाच्या युट्युबरने या व्हिडिओला एक मजेदार प्रयोग म्हटले आणि त्याच्या चॅनलवर पोस्ट केले ज्याचे फक्त 133 सदस्य आहेत. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. काही लोकांनी रेल्वेला टॅग करून त्यावर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. या व्हिडिओची दखल घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम १४५ आणि १४७ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
रेल्वे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सीपीआरओने राज्यातील जनतेला असे आवाहन केले आहे की, रेल्वे रुळांवर असे व्हिडिओ बनवू नका किंवा रुळांशी छेडछाड करू नका, अन्यथा त्यांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा दावा रेल्वे पोलिस करत आहेत.




